मनसे अध्यक्ष राज ठाकरे २१ ते २३ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर

  • मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी घेतली नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक : करणसिंग बावरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आज कृष्ण कुंज, मुंबई येथे नाशिक जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्ष यांचे सोबत आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी व शाखा अध्यक्षांच्या नेमणूकी संदर्भात महत्वाची बैठक घेतली.
या वेळी आ. राजसाहेब ठाकरे व मनसेचे वरिष्ठ नेते यांनी सहाही विभाग अध्यक्षांबरोबर प्रथम वेगवेगळे व नंतर एकत्रितपणे भेट घेऊन पक्ष बांधणी बाबत सविस्तर चर्चा केली.

या वेळी मा. राजसाहेबांनी सहाही विभाग अध्यक्षांना स्वतःचा व्यक्तिगत मोबाईल नंबर दिला व यापुढे थेट संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगामी २१, २२ व २३ सप्टेंबर दरम्यान स्वतः मा. राजसाहेब ठाकरे व मुंबईतील सर्व प्रमुख नेते मंडळी पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार आहे. २१ सप्टेंबर रोजी युवा नेते मा. अमित ठाकरे व सर्व मनसे प्रमुख नेते आणि २२ तारखेपासून स्वतः मा. राजसाहेब ठाकरे नाशिक भेटीवर येणार आहेत. २२ तारखेला सर्व नूतन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका होणार आहेत व २३ तारखेला सर्व सहाही विभागाचे विभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा होणार आहे.

या बैठकीला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे सह युवा नेते अमित ठाकरे, वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदिप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परूळेकर हे जातीने उपस्थित होते तर नाशिक मधुन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकूश पवार यांच्यासह विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम व योगेश(बंटी) लभडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *