ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मनपा शाळेत विद्यार्ध्यांना मास्क व शालेय साहित्य वाटप


नाशिक: शुभम आहिरे

५ सप्टेंबर शिक्षक दिन सप्ताह निमित्ताने ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देवळाली गाव येथील मनपा शाळा क्रमांक ६१ येथील विद्यार्ध्यांना मास्क व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आर्थिक दुर्बळ घटकातील कुटूंबातील ५ विद्यार्थी संस्थेच्या वतीने दत्तक घेण्यात आले अश्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी दिली. कोविड काळात हात स्वच्छ धुणे, मास्क चा वापर करणे, संभाषण करत असतांना सुरक्षित अंतर ठेवणे आरोग्याची काळजी घेणे याविषयी विद्यार्थ्यांना प्रभोधनात्मक मार्गदर्शन करून आरोग्याचे धडे देण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक भाग्यश्री देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, राजेंद्र मोरे, संध्या दुर्गुडे, तुषार शेलार, अमोल देशमुख, मंगला म्हस्के, कीर्ती झिंजाडे, साहेबराव अरिंगळे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *