दक्ष न्यूज – धर्मवीर बलिदान मास २८ फेब्रुवारी ते २९ मार्च ,समजून घ्या बलिदान मास म्हणजे काय ?
दक्ष न्यूज प्रतिनिधी
नाशिक ; धर्मवीरांचे मरण एक दिवसांचे नव्हते ते मरणाच्या दिशेने ३० दिवस वाटचाल करत होते म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिन्दूस्थान , श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशातील विविध राज्यात धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळत असतो.धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पकडले गेलेल्या क्षणापासून मरणयातना भोगत होते , संपूर्ण तीस दिवस धर्मवीरांवर आणि त्यांचे परममित्र कवी कलशांवर अनंत अत्याचार औरंगजेबाकडून सुरू होता .अन्नाचा त्याग धर्मवीरांनी शेवटच्या काळात केला होता .असा अत्याचार औरंगजेब करत होता…
या संपूर्ण ३० दिवसांत , पहिल्या दिवशी डोक्यावरील केस काढले जातात , मुंडन केलं जातं , संकल्प सोडला जातो , पायात पादत्राणे या ३० दिवसात घालत नाही , गोड पदार्थ खालला जात नाही , टीव्ही बघितला जात नाही , कोणत्याही आनंदाच्या म्हणजे लग्नसोहळा , वाढदिवस कार्यक्रमात जात नाही किंवा स्वतः चा ही वाढदिवस साजरा करत नाही , संपूर्ण ३० दिवस हा महिना सुतकाचा त्यागाचा , बलिदानाचा , आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान आठवून चौकाचौकात बहुसंख्येने एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याचा महिना आहे .शहरातील गुरुजींच्या धारकार्यांनी तसेच शिव शंभु भक्तांनी आज पासून मुंडण करून मास पाळणे सुरू केले आहे.
आणि शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्या च्या दिवशी धर्मवीरांची हत्या औरंगजेबाने करून धर्मवीरांच्या उरलेल्या शरीराची विटंबना करून , त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वाळलेल्या निवडुंगाच्या फण्यात टाकले गेले.धर्मवीरांची त्या काळी न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मूकपदयात्रा काढली जाते…

नाशिक शहरात जवळपास चाळीस ठिकाणी हा धर्मवीर बलिदान मास आजपासून पळाला जात आहे….
काळाराम मंदिर , सरसुभे लेन आर के , राजीव नगर , गणेश चौक सिडको , शनी मंदिर सिडको , लहवीत , देवळाली कॅम्प , विंचूर दळवी , सातपूर , रामवाडी , पंचवटी अशा अजूनही बऱ्याच ठिकाणी धारकरी एकत्र येऊन धर्मवीरांना श्रद्धांजली दररोज वाहणार आहे…