दक्ष न्यूज – प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने केली महापुरुषांची बदनामी, कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी..
दक्ष न्यूज प्रतिनिधी
नाशिक ; छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून हिंसक व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे.तर मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.
राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. दरम्यान कारवाई न केल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक व सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जातील,असा इशारा देण्यात आला.
प्राशांत कोरटकर या व्यक्तीने केलेली वक्तव्ये –
१) ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा.
२) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता.
३) तुमचे महाराज पळून गेले.
४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा.
५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा.
६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं.
७) रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी मारून टाकेन
८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या घुसवील
९) तुला तिथं येऊन मारीन.
१०) तुला घरात येऊन मारीन

या प्रकरणाबाबत आज मा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना खा राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी संजय फडोळ, राजेंद्र शेळके, योगेश नाटकर पाटील,गौरव गाजरे,शोभाताई सोनवणे, ऍड. स्वप्ना राऊत, अविनाश वाळुंजे, ऍड अनिल गायकवाड, ऍड शिवाजी शेळके, अक्षय अनवट, अण्णा पिंपळे, रमेश खापरे, योगेश पिंगळे, रघुनाथ धोंडगे, भूषण शिंदे, सागर कातड, अनिल आहेर,संदीप हांडगे, वैभव वडजे,अनिता डेमसे,यांच्यासह अनेक मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते