नाशिक शहरातील मुख्य बाजार पेठेतील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा: युवासेना


नाशिक: शुभम आहिरे

स्मार्ट सिटी अंतर्गत विकासाच्या नावावर शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या दहिपुल,नेहरूचौक,मेनरोड,धुमाळ पॉईंट सराफ बाजार या परिसरातील रस्ते गेल्या ४ महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. आगामी काळ हा गणपती,नवरात्री,दिवाळी या उत्सवाचा असून या वेळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्याच्या परिस्थिती मध्ये अनेक ठिकाणी खडी,पेव्हरब्लॉक,पाईप,वायरिंग चे समान पडून आहे.रस्त्यांचे साईडचे कॉर्नर खोदून ठेवल्यामुळे येथील रहिवाशी घरांपर्यंत तसेच ग्राहक दुकानापर्यन्त जाऊ शकत नाही तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदाना द्वारे केली.

रस्ता क्रॉस करण्यासाठी प्लायवूड ठेवलेले आहे. तो प्लायवूड तुटल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी मोठी कसरत करावी लागते.पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहेत.खोदकामामुळे आजुबाजूच्या छोट्या गल्लीबोळीत गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यात हे रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीतून कसे बसे सावरणाऱ्या व्यवसायिकांची कोंडी झाली आहे. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून येथील रहिवासी व व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक युवासेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर, गोविंद कांकरिया शहर समन्वयक प्रवीण चव्हाण ,लुमान मानियर,अक्षय जगताप,अमोल कुंभकर्ण ,किरण पाटील उपस्थित होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *