शामराव रामचंद्र दिघावकर, आय.पी.एस. सेवानिवृत्त पोलीस उप महानिरीक्षक यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

सेवानिवृत्त पोलीस उप महानिरीक्षक शामराव दिघावकर (भा.पो.से.) यांची पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी माहे सप्टेंबर 2021 पासुन पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

शामराव रामचंद्र दिघावकर हे विद्युत अभियांत्रिकी ( B.E. Electrical) पदवी धारक असुन ते काही कालावधी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सेरळसेवेने पोलीस उपअधिक्षक या पदावर निवड होवून त्यांनी नाशिक, अकोला, जळगांव, औरंगाबाद व जालना येथे कर्तव्य दक्ष पोलीस उप अधिक्षक म्हणून कामे पार पाडली.

तद्नंतर जालना येथून पोलीस अधिक्षक या पदावर पदोन्नती झाल्यानंतर ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, वाशिम, बुलढाणा व धुळे येथे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान सन 2003 साली त्यांची आय. पी. एस. म्हणजे भारतीय पोलीस सेवेमध्ये केंद्र शासनाने पदोन्नती दिली.

महाराष्ट्र शासनाने त्यांना धुळे येथून पोलीस उप महानिरीक्षक (D.I.G.) या पदावर पदोन्नतीवर नागपूर येथे नियुक्ती केली व नागपूर येथूनच ते पोलीस उप महानिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.

शामराव रामचंद्र दिघावकर यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रपती पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह तसेच शासनाकडून चांगल्या कामासाठी पदके व पुरस्कार देवून वेळोवेळी गौरवण्यात आलेले आहे.

शामराव रामचंद्र दिघावकर यांचा पोलीस सेवेचा अनुभव व गौरवास्पद कामगीरी लक्षात घे महाराष्ट्र शासनाने त्यांना सदस्य, पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक या पदावर सेवानिवृत्तीनंतर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केलेले आहे. त्यांचे या नियुक्ती बददल त्यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *