शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बनायत


  • वादग्रस्त कारकीर्द असणाऱ्या कान्हूराज बगाटे यांची बदली

शिर्डी : अमित कबाडे

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री बानायत धिवरे रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तर बगाटे थेट IAS नसल्यानं त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते.

काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानायत यांची नेमणूक करण्यात आली आहे. बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *