दक्ष न्यूज- नाशिक स्मार्ट सिटीला ICAI कडून ‘सर्वोत्कृष्ट विवरण’ 2024 चा प्रतिष्ठित पुरस्कार
दक्ष न्युज: करणसिंग बावरी
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (NMSCDL) भारतीय सर्टीफाइड लेखापाल संस्था (ICAI) कडून ‘स्वार्थकृष्ट आर्थिक विवरण – स्थानिक संस्था (2024-2025)’ हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.नवी दिल्लीत ICAI च्या World Forum of Accountants (WOFA) या कार्यक्रमात केंद्रीय कायदा मंत्री मा. श्री. अर्जुन राम मेघवाल आणि ICAI चे अध्यक्ष श्री. रंजीत अजमेरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक स्मार्ट सिटीने भारतातील सर्व स्थानिक संस्थांमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शकता आणि वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमांचे पालन करून ही विशेष ओळख मिळवली आहे.देशातील नामांकित स्मार्ट सिटी प्रकल्पांपैकी नाशिक स्मार्ट सिटीने आपल्या आर्थिक व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रामाणिकपणाच्या आधारे हा सन्मान मिळवला.

ICAI च्या मान्यतेनुसार, नाशिक स्मार्ट सिटीने उत्कृष्ट वित्तीय शिस्त दाखवून देशभरातील इतर स्मार्ट सिटींसाठी आदर्श ठरली आहे.पुरस्कार स्वीकारण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुमंत मोरे, कंपनी सचिव श्री. महेंद्र शिंदे आणि मुख्य वित्त अधिकारी श्री. सादेख शेख यांनी उपस्थिती लावली.
या सन्मानाबद्दल नाशिक स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मा. मनपा आयुक्त श्रीमती नितीशा खांडे, संचालक मा. सुशांत संचालक भास्करराव मुंढे आणि मा. सीईओ आनंद जगताप यांनी अभिनंदन केले असून, हा पुरस्कार नाशिक स्मार्ट सिटीच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.हा पुरस्कार नाशिकच्या स्मार्ट सिटीच्या आर्थिक व्यवस्थापनातील उत्कृष्टतेची पावती आहे आणि भविष्यातील योजनांसाठी प्रेरणा देणारा ठरेल.