दक्ष न्यूज: नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून मंडल अधिकारी प्रविण गणपत प्रसाद यांना 2,000/- रुपये लाच घेताना पकडले आहे.
दक्ष न्यूज : संतोष विधाते
नाशिक : तक्रारदाराने चांदवड तालुक्यातील काळखोडे गावात जमीन खरेदी केली होती, त्याची 7/12 नोंदणी करण्यासाठी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. संबंधित प्रकरण मंजुरीसाठी मंडल अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे आले होते. तक्रारदाराने दिनांक 12/02/2025 रोजी चौकशी केली असता, प्रवीण प्रसाद यांनी नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात 2,000/- रुपयांची लाच मागितली.
पडताळणी व सापळा कारवाई:
तक्रारदाराने याबाबत तक्रार दाखल केली असता, दिनांक 13/02/2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रवीण प्रसाद यांनी 2,000/- रुपये लाच घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर, चांदवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सापळा पथक:
सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री. अमोल सदाशिव वालझाडे यांनी केले, तर पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे, पोलीस नाईक सुरेश चव्हाण आणि चालक हवालदार विनोद पवार यांचा समावेश होता. मार्गदर्शन नाशिक परीक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले.
नागरिकांसाठी आवाहन:
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.दूरध्वनी क्रमांक: 02562-234020टोल फ्री क्रमांक: 1064दुसरा क्रमांक: 02532-257830