दक्ष न्यूज- जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील मेहु गावात भ्रष्टाचारविरोधी विभागाची (ACB) सरपंचाविरोधात यशस्वी सापळा कारवाई
दक्ष न्यूज: संतोष विधाते
जळगाव : जळगाव जिल्ह्यात काल दुपारी पारोळा तालुक्यातील मेहु गावात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) यशस्वी सापळा कारवाई करत सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपींची ओळख:
आरोपी क्रमांक 1 जिजाबाई गणेश पाटील (वय 43), सरपंच; शुभम गणेश पाटील (वय 26), सरपंचांचा मुलगा; गणेश सुपडू पाटील (वय 55), सरपंचांचे पती; आणि समाधान देवसिंग पाटील (वय 35), खाजगी सेतु सुविधा केंद्र चालवणारे, हे सर्व आरोपी मेहु ता. पारोळा, जि. जळगावचे रहिवासी आहेत.
लाचेची मागणी आणि स्विकार:
तक्रारदार हे 2017-2022 या कालावधीत मेहु गावाचे सरपंच होते. त्यांनी ग्रामपंचायतीकडून व्यायामशाळेच्या बांधकामासाठी मंजूर 7 लाख रुपयांच्या निधीसाठी मागणी केली होती. आरोपी क्रमांक 1 यांनी तडजोडीअंती 40,000 रुपये लाचेची मागणी केली आणि ती दि. 12/02/2025 रोजी स्विकारली. आरोपी क्रमांक 2 कडून घटनास्थळावर 3,00,000 रुपयांचा धनादेशही जप्त करण्यात आला आहे.
सापळा कारवाई:
ACB पथकाने 40,000 रुपयांची हस्तगत रक्कम आणि आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम हस्तगत केली. आरोपी क्रमांक 2 कडून 3,600 रुपये, आरोपी क्रमांक 3 कडून 5,170 रुपये आणि आरोपी क्रमांक 4 कडून 1,400 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल प्रक्रिया आणि तपास:
सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी निरीक्षण चालू आहे.
सापळा अधिकारी आणि पथक:
सापळा अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, ACB जळगाव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ACB जळगाव यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ भ्रष्टाचारविरोधी विभागाशी संपर्क साधावा.