रोलेट ( बिंगो ) संचालकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; शिवसंग्राम संघटनेची मागणी

नाशिक: करणसिंग बावरी

महाराष्ट्रामध्ये मुंबई स्थित चौरसीया बंधू मार्फत चालविण्यात येणाऱ्या ऑनलाईन जुगार वध नावाने चालवला जातो. नाशिक शहरातही (बिनों) नावाने हा जुगार ओळखला जातो. नाशिकमध्ये कैलास जोगेंद्र शहा नामक व्यक्तीच्या माध्यमातून हा जुगार चालविला जातो. ही माहिती पोलीस प्रशासनाकडे असून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे.

यासाठी रोलेट ( बिंगो ) संचालकांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन सचिन पाटील पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना देण्यात आले. निवेदन देताना शरद तुंगार शिवसंग्राम नाशिक जिल्हा अध्यक्ष, सुनिल बोराडे युवक अध्यक्ष, नाशिक उपाध्यक्ष मच्छिंद्र कुर्हे हजर होते.

अनेक चांगल्या घरातील मुले या खेळामुळे कंगाल झालेली आहेत. राज्यातील व नाशिक शहरातील वरच तरूण मुले या जुगाराच्या आहारी गेली आहेत. महाराष्ट्र व नाशिक येथे तरुणांनी याच्या आहारी जाऊन कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीसांकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु पोलीस प्रशासनाकडून याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येत नाही.

या जुगार ऑनलाईन पध्दतीने केल्या जात असला तरी नाशिक शहरात अनेक ठिकाणी या जुगाराचे कंट्रोल रूम कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाला याबाबत पूर्ण माहिती असताना पोलीस प्रशासनाकडून याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढत चालली आहे. नाशिक शहरातील सुचिता नगर येथील एका तरुण मुलाने आत्महत्या केली आहे व ग्रामीण भागातील त्रंबकेश्वर खंबाळे येथील नामदेव राजाभाऊ चव्हाण यांनी देखील आत्महत्या केली आहे व त्यांचा दि.१०.०७.२०१५ रोजी त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तसेच संतोष मेढे नामक व्यक्तीने देखील या जाचातून कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. तसेच पळसे येयील तीन व्यक्तीचे जाब जबाब घेऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. आत्महत्यास जबाबदार असणारे रोलेट (बिंगी) संचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविणे आवश्यक असताना याबाबतची कोणतीही ठोस कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

या प्रश्नावर आमदार देवयानी सुहास फरांदे यांनी अधिवेशन प्रश्न क्र. २९/१०/२०२० सदर रोलेट (बिंगो) या विषय मांडला होता. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी आमदार राहूल उत्तमराव ढिकले व आमदार सरोज आहेर यांनी देखील सदर ऑनलाईन जुगार कारवाईसाठी पाठपुरावा केला आहे. याबाबत शिवसंग्राम संघटनेकडून पोलीस आयुक्त साहेब, नाशिक यांना दि.१२.०९.२०१९ रोजी रोलेट नावाने चालवल्या जाणाच्या जुगारावर कारवाई करावी व सदर आरोपीवर मोक्का अंतर्गत तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शिवसंग्राम नाशिक जिल्हयाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतरही शहरात नाशिक रोड, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापुर, देवळाली गाव, आडगाव, सातपूर येथे या काळात गुन्हे नोंद केले आहे. तरी सदर आरोपीस तात्काळ अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *