दक्ष ब्रेकिंग- नराधम शिक्षक व मुख्याध्यापकाचे तातडीने निलंबन; शिक्षणमंत्री भुसे यांचे प्रशासनाला सक्त निर्देश
दक्ष न्यूज: करणसिंग बावरी
इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे मानवी मुल्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचेगाव (ता. नेवासा) येथे सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी यांनी अतिप्रसंग केला, अशी संतापजनक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी घोटी पोलीस स्टेशन येथे दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

घटनेची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दोन्ही आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शिक्षण विभागाने तत्काळ शिक्षक व मुख्याध्यापकाचे निलंबन केले असून, नाशिक पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.