दक्ष न्यूज- एन.डी.सी. ए. प्रोफेशनल लीग सीझन 3 चे थरार पुन्हा एकदा रंगणार:
दक्ष न्यूज: करणसिंग बावरी
नाशिक: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित एन डी सी ए प्रोफेशनल लीग सीझन 3 चा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. या स्पर्धेच्या खेळाडू लिलावाची प्रक्रिया नुकतीच एलोरा ग्रुपचे संजय नंदन यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे, सहसचिव योगेश हिरे, आणि सर्व संघ मालक उपस्थित होते.
यंदाच्या लिलावात प्रत्येक संघाने 16 खेळाडूंचे निवड केले. हा लिलाव केन्सिंगटन क्लबवर आयोजित करण्यात आला. स्पर्धेत नाशिकमधील डॉक्टर्स, आर्किटेक्टस, सीए, वकील, बिल्डर्स, इंजिनिअर्स, उद्योजक आणि इतर व्यावसायिक सहभागी होत आहेत.

या वर्षीचा चषक श्रीमती थोरात आणि इमर्जिंग क्रिकेट अकॅडमीचे शंतनू वेखंडे यांनी प्रायोजित केला आहे, तर खेळाडूंचा पोषाख ॲडव्होकेट विवेकानंद जगदाळे यांनी प्रायोजित केला आहे.
स्पर्धेत नाशिकमधील सात संघ सहभागी होणार आहेत. संघ आणि त्यांच्या मालकांची नावे पुढीलप्रमाणे:
1. ग्रिफिन लायन्स अकॅडमी – महेश उचित
2. जगदाळे वॉरियर्स – विवेकानंद रामकृष्ण जगदाळे
3. प्रो जंबो – व्हि. मनोरंजन
4. ए बी इलेवन – अनिरुद्ध भांडारकर
5. पंचवटी वॉरियर्स – उमेश पालकर
6. मराठा वॉरियर्स – वैभव पाटील
7. जे सी रायडर्स – प्रशांत चव्हाण
नाशिकमध्ये एक शानदार क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याची तयारी आहे, आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा!