दक्ष न्यूज- निफाड नगरपंचायत – करवाढीची कार्यवाही स्थगित
दक्ष न्यूज: योगेश कर्डीले
निफाड: निफाड नगरपंचायतीच्या सभागृहात 4 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सर्व साधारण सभेत निफाड शहरातील करवाढीच्या विषयावर चर्चा झाली. नगराध्यक्षा सौ. कविता धारराव आणि उपनगराध्यक्ष श्री अनिल कुंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निफाड शहरातील चतुर्थ वार्षिक कर आकारणीवरील मुद्यावर चर्चा करण्यात आली.
सभेत सर्वाधिक चर्चा कर आकारणीच्या तांत्रिक चुका आणि वाढीव आकड्यांवर झाली. अनेक नोटिसांमध्ये तांत्रिक चुका झाल्यामुळे कर आकारणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, सभेने करवाढीची कार्यवाही तात्काळ थांबवून, फेर आकारणी करून सुधारित कर आकारणी घेण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वपूर्ण निर्णय:
1. शिक्षण कर, वृक्ष कर आणि रोजगार हमी कर निफाड शहरातील कुठल्याही मालमत्तेस आकारण्यात येणार नाही.
2. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल.
3. ग्रामपंचायत कालीन कर आकारणी नियमित सुरु राहील, जोपर्यंत सुधारित प्रस्ताव मंजूर होत नाही.
नगरपंचायतीने नागरिकांना आश्वासन दिले आहे की, सद्यस्थितीतील करवाढीच्या बाबतीत कोणताही शंका न ठेवता नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरावी. प्रशासन आणि नागरिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्व सन्माननीय सदस्य आणि प्रशासन बांधील आहे.सभेच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक, अधिकारी कर्मचारी आणि सदस्य उपस्थित होते.