नाशिक

दक्ष न्यूज- आडगाव पोलिसांनी २४ तासांत पकडले खुनातील सहा आरोपी


दक्ष न्यूज: भावेश बागुल

नाशिक: आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या २४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. ३६/२०२५ या गुन्ह्याअंतर्गत भादंवि कलम १०३, १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), ३५१ (२), ३५२, ११५(२), ११८(१), ११८(२), १०९ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ प्रमाणे फिर्याद मंजुळा कुचेकर यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २३:४८ वाजता नोंदवण्यात आला होता.

तपासासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ श्री. किरणकुमार चव्हाण आणि पंचवटी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर निकम आणि गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध घेतला.सुरुवातीला, रोहित धुळे, सचिन कोळे, आणि प्रविण लोनकर या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून सखोल चौकशी केल्यानंतर इतर आरोपींची माहिती मिळाली. सुनिल मोरे, सचिन मोरे आणि संजय रणसिंगे या तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सापळ्याचा वापर केला. या पथकाने वेळेत गुन्ह्याचा सुगावा लावून आरोपींना ताब्यात घेतले.

तपासात पोलीस उपनिरीक्षक मयुर निकम यांच्यासोबत पोहवा सुरंजे, पोहवा शिवाजी आव्हाड, पोहवा काटकर, पोहवा वाघ, पोहवा मगर, पोहवा मनोज परदेशी, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, सचिन सानप, अक्षय गोसावी, निखील वाघचौरे आणि कुदंन राठोड यांनी सहभाग घेतला. सर्व आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुल केले आहे.या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *