दक्ष न्यूज- पंचवटीतील टोळीयुद्ध आणि गोळीबार: गावठी कट्टे आणि अवैध हत्यारांचा वापर
दक्ष न्यूज-प्रवीण सुरुडे
नाशिक: पंचवटी, ३ फेब्रुवारी २०२५:गणेशवाडी परिसरातील पोस्ट ऑफिससमोर शुक्रवार (दि. ३१ जानेवारी) रात्री ११:१५ वाजता दोन गटांमध्ये झालेल्या वैयक्तिक वादाने हिंसक स्वरूप घेतले. या घटनेत ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर (वय २८, रा. कमलनगर, हिरावाडी) आणि मयुर भास्कर पवार (वय ३०, रा. कोळीवाडा, गणेशवाडी) यांच्यातील वाद थेट रस्त्यावर आला, ज्यामध्ये दांडके, वीटा, दगड आणि बियरच्या बाटल्या वापरून हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत पसरली.
या घटनेची माहिती मिळताच हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकीतून तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हस्तक्षेप करून या टोळी युद्धाला आळा घातला. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गजानन चौकातील गोळीबार:
रविवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास गजानन चौकात झालेल्या गोळीबारामुळे पंचवटी परिसर पुन्हा हादरला. दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि याचा शेवट गावठी कट्ट्यांद्वारे झालेल्या गोळीबाराने झाला. हरदिपसिंग औलक (वय २७, रा. रेणू अपार्टमेंट, नागचौक, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घराकडे पायी जात असताना, योगेश जगन मोरकर (वय ३१, रा. जोशीवाडा, नागचौक, पंचवटी) आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवले आणि मागील वादाचा राग काढत त्यांच्यावर हल्ला केला.

1.पहिला वाद:
ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर आणि मयुर भास्कर पवार यांच्यातील जुन्या वादामुळे ३१ जानेवारीच्या रात्री टोळीयुद्ध पेटले. दोन्ही गटांनी रस्त्यावर येत एकमेकांवर दांडके, वीटा, बियरच्या बाटल्या फेकून हल्ला केला. या घटनेमुळे पंचवटी परिसरातील नागरिक दहशतीखाली होते. नजीकच्या पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले.
2. गोळीबाराची घटना:रविवारी रात्री गजानन चौकात हरदिपसिंग औलक यांच्यावर साहिल उर्फ इटली, सोहम जोशी, आणि राहुल कानडे यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. साहिल उर्फ इटली याने “तुझा काटा काढतो” असे म्हणत औलक यांच्या डोक्यावर हल्ला केला. सोहम जोशी आणि राहुल कानडे यांनी त्यांच्या डोक्याजवळील भागावर दगडाने मारहाण केली. योगेश जगन मोरकर आणि इतर साथीदारांनी औलक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी पळून गेले.
3. परस्परविरोधी तक्रारी:दुसरीकडे, योगेश जगन मोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यावर ऋषिकेश उर्फ सोंडंग्या गरड, रूपेश उर्फ वाळ्या गरड, नितीन जाधव, हरदिपसिंग औलक आणि हर्षल यांनी हल्ला केला. वाद विकोपाला गेल्यावर रूपेश उर्फ वाळ्या गरड यांनी क्रिकेट बॅट हिसकावून घेतली, आणि ऋषिकेश उर्फ सोंडंग्या गरड यांनी गावठी कट्टा काढून गोळीबार केला. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला.दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.निष्कर्ष: