नाशिक

दक्ष न्यूज- म्हसरूळमध्ये डॉमिनोज पिझा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, करणाऱ्या आरोपिंना म्हसरूळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केले जेरबंद


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्पर कार्यवाही करत डॉमिनोज पिझा रेस्टॉरंटमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली. दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, डॉमिनोज पिझा रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेत काही इसमांनी रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. फिर्यादी दादाजी किसन मोहिते यांच्या तक्रारीनुसार, पिझा डिलीव्हरीसाठी विलंब झाल्यामुळे आरोपींनी रागात संगणक, प्रिंटर यांची नासधूस करून पिझा मेकरला मारहाण केली.

म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास हाती घेतला. पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे, मनोहर क्षिरसागर, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, प्रशांत देवरे, गुणवंत गायकवाड, जितू शिंदे आणि प्रमोद गायकवाड यांच्या समन्वयातून गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू झाला.

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सुरज बाळासाहेब फड, निरज दीपक खैरनार आणि साहिल कैलास गायकवाड या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. हे तिघे स्नेहनगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ येथील रहिवासी आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (परिमंडळ १) मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त (पंचवटी विभाग) पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकाने वेगवान तपास करून अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले.

या कामगिरीमुळे म्हसरूळ परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *