नाशिक

दक्ष न्यूज- नाशिक व पुणे येथील मोफत मराठा वधू-वर मेळावे”


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

नाशिक: नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत मराठा वधू-वर मेळावे आयोजित केले जात आहेत. नाशिकमध्ये २ फेब्रुवारी २०२५ रोजी, गंगापूर रोडवरील श्री. रावसाहेब थोरात सभागृह (MVP हॉल) येथे 93 वा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, राजगुरुनगर (खेड) येथील हॉटेल साईराज मंगल कार्यालय येथे 94 वा मेळावा होणार आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे साहेब उपस्थित राहणार असून, MVP संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील उत्तमराव ढिकले आणि ॲड. नितीनजी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

यावर्षीपर्यंत या संस्थेने चार हजार पेक्षा जास्त विवाह जमवले आहेत, त्यात 613 विवाह विधवा, विधुर आणि घटस्फोटीत व्यक्तींचे आहेत. मराठा सोयरीक संस्थेने 92 मेळावे घेतले असून, या मेळाव्याद्वारे वधू-वर एकमेकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधू शकतील.

पालकांनी मुला-मुलींना घेऊन बायोडाटा व आधार कार्डाची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची पूर्वतयारी आवश्यक नाही, मेळाव्यात येऊन नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी 8453902222 या नंबरवर संपर्क करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *