नाशिक

दक्ष न्यूज- महाराष्ट्रात HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक


दक्ष न्यूज- करणसिंग बावरी

नाशिक: महाराष्ट्रातील मोटार वाहन विभागाने ०४ डिसेंबर २०२४ रोजी नवीन आदेश जारी केला असून, सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) अनिवार्य करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२५ ही या निर्णयाची शेवटची तारीख आहे. मात्र, इतका महत्त्वपूर्ण निर्णय असूनही याबाबतची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून जाहिरात वा जनजागृती केली गेलेली नाही.

मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर शहरांमध्ये वाहतूक पोलिसांनी जनतेपर्यंत या निर्णयाची माहिती पोहोचवण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. परिणामी, वाहनचालकांमध्ये या निर्णयाबाबत अनभिज्ञता आहे. मात्र १ एप्रिल २०२५ पासून HSRP बसवलेल्या गाड्यांवर त्वरित इ-चलान काढण्याची मोहीम राबवली जाईल.

आपल्या वाहनावर HSRP बसवून वेळेच्या आत पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे, ज्यामुळे अवांछित दंड किंवा इ-चलान टाळता येईल.

शासन आदेश आणि HSRP बुकिंगसाठी खालील लिंकवर भेट द्या:

शासन आदेश:

https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdfHSRP

बुकिंग: https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html

अधिक माहितीसाठी, खालील व्हिडिओ बघा:

HSRP व्हिडिओ

HSRP व्हिडिओ 1

HSRP व्हिडिओ 2

तुमच्या गाडीसाठी HSRP लवकरच बसवा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हेदेखील कळवा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *