नाशिक

दक्ष न्यूज- ट्रिपलसीट दुचाकी चालवून वाहतूक अंमलदारांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला ठोठावली ही शिक्षा


दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक: ट्रिपलसीट दुचाकी चालवून मद्यधुंद अवस्थेत वाहतूक अंमलदारांशी हुज्जत घालणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला न्यायालयाने उठेपर्यंत कोर्टात हजर राहण्याची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी सुरेश सुखदेव झनकर (रा. रामराज अपार्टमेंट, रामकृष्णनगर, अंबड लिंकरोड) याच्यावर न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

ही घटना २७ मार्च २०१४ रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा येथे घडली. अंमलदार गजानन सतीश पाटील हे त्या दिवशी कर्तव्यावर असताना, आरोपी सुरेश झनकर, नवनाथ अरुण सुरूडे (रा. घोटी, इगतपुरी) आणि सुभाष मधुकर झनकर (रा. घोटी) हे तिघे मद्यसेवन करून दुचाकीवर ट्रिपलसीट जात होते. अंमलदारांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता, त्यांनी संगनमताने अंमलदाराशी वाद घालत सरकारी कामात अडथळा आणला होता.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने आरोपीला उठेपर्यंत कोर्टात हजर राहण्याची शिक्षा ठोठावली असून, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल हा निर्णय घेतला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *