नाशिक

दक्ष न्यूज – नाशिक शहरातील काही भागात 1 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद


दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

नाशिक : नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे विद्युत विषयक कामे नियोजित केल्यामुळे, शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक शहरातील काही भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.गंगापूर धरण पंपिंग स्टेशनवरील कामांमुळे खालील भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील:

बाराबंगला शिवाजीनगर

पंचवटी

निलगिरीबाग

गांधीनगर

नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र

तसेच, मुकणे धरण पंपिंग स्टेशनवरही सबस्टेशन आणि पंप हाऊसची विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. यामुळे रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या पाणीपुरवठ्याचा दाब कमी राहील.

महापालिकेने नागरिकांना या कालावधीत पाणी साठवून ठेवण्याचे आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.संपूर्ण नाशिक शहरासाठी महत्त्वाची सूचनाशनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील.रविवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.महानगरपालिकेने या कामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *