दक्ष न्यूज-त्रंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश
दक्ष न्यूज- प्रभाकर गारे
त्रंबकेश्वर : त्रंबकेश्वर तालुका, जो एक आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचे आहे. इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी इंग्रजीत सहज भाषण करत असून, शालेय स्पर्धांमध्येही त्यांची चांगली कामगिरी दिसून येते.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोजोली येथे बीट स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टाके देवगाव केंद्रातील विद्यार्थ्यांनी खूप यश मिळवले.
स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे आहेत:
1. स्वराज भगवान डोखे – प्रथम क्रमांक
2.मयंक बाजीराव देहाडे – द्वितीय क्रमांक

शालेच्या मुख्याध्यापक बोराडे सर यांनी विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालक व ग्रामस्थांचे योगदानही महत्वाचे ठरले आहे.या यशाचे श्रेय शाळेच्या स्वराज्य वर्ग शिक्षिका गुंजाळ मॅम यांना जाते, ज्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षण पद्धतीला मान्यता दिली.