दक्ष न्यूज – व्हॉइस ऑफ मीडियाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी कुमार कडलग यांची फेरनिवड
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : जगभरातील 57 देशांमध्ये कार्यरत आणि राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या “व्हॉइस ऑफ मीडियाच्या” नाशिक जिल्हाध्यक्षपदी कुमार कडलग यांची दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख मिलिंद टोके यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे ही निवड प्रक्रिया पार पडली.

जिल्हा सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, नाशिक जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष कुमार कडलग यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले. हा प्रस्ताव जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी, सिन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ आव्हाड, येवला तालुका अध्यक्ष किरण ठाकरे आणि नाशिक महानगर अध्यक्ष इम्रान शेख यांनी ठेवला. या प्रस्तावाला पेठ तालुक्याचे प्रकाश पगारे, नाशिकचे दिनेश ठोंबरे, आणि श्रीमंत बागल यांनी अनुमोदन दिले.
प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख मिलिंद टोके यांच्या समोर मांडण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिनविरोध निवड प्रक्रियेची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचे मार्गदर्शन
निवडणुकीनंतर बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि पत्रकार कल्याणासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“राष्ट्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरेल. पत्रकारांच्या कल्याणासाठी कोणत्याही भेदभावाशिवाय काम करत ‘व्हॉइस ऑफ मीडियाचा’ अजेंडा जिल्हाभर प्रभावीपणे राबवू.” – कुमार कडलग
उपस्थित मान्यवर
या बैठकीला डिजीटल विंगच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी पुरी, जिल्हाध्यक्ष रश्मी मारवाडी, जिल्हा कार्यकारिणीतील दिनेश ठोंबरे, करणसिंग बावरी, इम्रान शेख, नारायण अभाले, मायकल खरात, संजय परदेशी, योगेश रोकडे, तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमार कडलग यांची फेरनिवड नाशिकमधील पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.