दक्ष न्यूज – कुंदेवाडीत घरफोडी; सुमारे 27 हजार रुपयांचे दागिने लंपास
दक्ष न्यूज : प्रतिनिधी योगेश कर्डिले
निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथे 14 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री घरफोडीचा प्रकार घडला. कुंदेवाडी येथील रहिवासी तुषार सुनील दोंदे (वय 29) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून 27,500 रुपयांचे दागदागिने आणि ऐवज लंपास केला.

घरफोडीसाठी चोरट्यांनी घराचे कडी-कोंडा तोडून प्रवेश केला आणि लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून कपाटातील दागिने चोरले. घटनेची माहिती मिळताच तुषार दोंदे यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनंतर निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर पवार यांनी तपास सुरू केला आहे.
घटनेने कुंदेवाडी परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घरफोड्यांचा वाढता प्रकार पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.