“रोलेट किंगवर” पोलिसांची मेहरनजर

नाशिक: करणसिंग बावरी

ऑनलाईन रोलेट जुगार खेळण्यासाठी आयडी व पासवर्ड देऊन युवा पिढीला जुगाराच्या जाळ्यात अडकविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होताना दिसत आहे. म्हणूनच अलीकडच्या काळातील रोलेटविरुद्ध शहर पोलिसांनी आठ ते दहा ठिकाणी छापे मारून कारवाई केली आहे. आयडीसह पासवर्ड देणान्या पंटर तसेच एजंटविरुद्ध कारवाई होत असताना नाशिकसह विविध शहरांमध्ये रोलेटचे जाळे पसरवणारा ‘रोलेट किंग’ व त्याचे मुंबईतील सुत्रधार यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

ऑनलाईन रोलेटसारख्या जुगारातून युवकांना गंडवले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने. यातून अनेकांची मोठी आर्थिक व कौटुंबिक होत असल्याने या व्यवसायाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी राजकीय पक्ष व समाजसेवी संस्था, संघटनाचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेत आंदोलन करण्याचे इशारा दिल्या नंतर थेट गृह मंत्रालयानेच सुद्धा यात लक्ष देत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची मागे बैठक घेत ऑनलाईन रोलेटवर कारवाई करतानाच या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळा असे निर्देश दिले होते त्यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील व पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले होते परंतु अजून ही या आदेशाबाबत कारवाई मात्र शून्यच आहे.

शहरातील नाशिकरोड, सिडको, पंचवटी, मुंबई नाका, सातपूर, उपनगर, गंगापूर रोड, आडगाव, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यातील हद्दीत आता पर्यंत अनेक ऑनलाइन जुगार खेळविणाऱ्या एजंट वर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत अटक करून कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे उघडपणे सुरू असणारे रोलेट आता शहरात व जिल्ह्यात छुप्या पध्दतीने सुरू आहेत. या मुळे अनेक युवा पिढी उध्वस्त होताना दिसत आहे. कालच रोलेट बिंगो गेम मुळे कर्जबाजारी झालेल्या सातपूर मधील विवाहित पुरुषांची धावत्या रेल्वे समोर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या वरून हे सिद्ध होत आहे की पोलिसांच्या कारवाई नंतरही शहरात ऑनलाइन रोलेट सुरूच आहे. या विवाहित पुरुषाची आत्महत्या पोलिसांना एक चपराक आहे. म्हणून आता पोलिसांनी थेट रोलेट किंगवर कारवाई करणे गरजेचे आहे. ऑनलाइन रोलेट किंगच्या चेल्यांवर कारवाई करताना त्यांच्या डोक्यावर हात ठेवणाऱ्या कैलासच्या मुसक्या आवळणे आज गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *