दक्ष न्यूज – सनातनी महामिलन: हिंदू समाजाच्या एकतेचा ऐतिहासिक उपक्रम नाशिकमध्ये आयोजित
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : गोदावरी नदीच्या पवित्र काठावर श्री गोपीनाथ गौड़ीय मठ आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने ऐतिहासिक ‘सनातनी महामिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसांचा कार्यक्रम रविवार, 12 जानेवारी 2025 आणि सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला जाईल.

कार्यक्रमाची प्रेरणा:
आजच्या बदलत्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीत हिंदू समाजाने एकत्र येऊन आपले सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक आधार बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या ‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ या आध्यात्मिक प्रेरणेचा विचार करून, हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उर्जेला एकत्र आणण्यासाठी या महामिलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महामिलनातील विशेष उपक्रम:
- भगवान श्री नृसिंह यज्ञ: सकल बाधा निवारण आणि उन्नतीसाठी नृसिंह यज्ञाचे आयोजन.
- हरिनाम संकीर्तन आणि हरीकथा: कालियुगाच्या युगधर्माला अनुसरून आध्यात्मिक उर्जा अनुभवण्यासाठी.
- सवत्स धेनु पूजन: परंपरेला साजेशा गोमातेच्या पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ.
- गीत, नृत्य आणि महाप्रसाद वितरण: शरीर-मनाचे पोषण व आनंदासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद.
- नगर संकीर्तन आणि गोदावरी आरती: सामूहिक धार्मिक कार्यक्रमाची सांगता.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
रविवार, 12 जानेवारी 2025:
- सकाळी 8:00 वाजता: सवत्स धेनु पूजन, तुलसी आरती, हरीकथा आणि नाम संकीर्तन, प्रसाद वितरण.
- सायंकाळी 5:00 वाजता: नाम संकीर्तन, संत-महंतांचे मार्गदर्शन, महाप्रसाद.
सोमवार, 13 जानेवारी 2025:
- सकाळी 7:00 वाजता: श्री नृसिंह यज्ञ प्रारंभ, हरीकथा, कीर्तन, महाप्रसाद.
- सायंकाळी 5:00 वाजता: नगर संकीर्तन, रामकुंडावर गोदावरी आरती आणि धर्मसभेने सांगता.
स्थळ:
श्रद्धा लॅन्स, गाडगे महाराज पुलाजवळ, शाही मार्ग, गोदाकाठ, नाशिक.
सर्व कार्यक्रम निशुल्क असून समस्त हिंदू बंधू-भगिनींना आवाहन:
सकल हिंदू समाजासाठी ही ऐतिहासिक संधी असून कार्यक्रमात सहभागी होऊन आपले आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री सदानंद दास: 917516108
सौ. कनकमंजिरी देवी दासी: 8669964108
श्री शुभानन्द दास: 7020157210