राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा- मेहबू शेख


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध बैठका, प्रवेशासोहळे आणि आढावा बैठका होत असताना, नाशिक तालुका आणि देवळाली मतदारसंघ बैठकीत युवकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड होते.

प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे स्वागत तालूका अध्यक्ष गणेश गायधनी आकाश पिंगळे, विशाल गायकर यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, महीला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,आदी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले की, युवकांनी फक्त आदरणीय शरदचंद्र पवार या एका विचाराने प्रेरित होऊन पक्षा साठी झोकून काम करावे, पक्ष तुम्हाला निश्चित न्याय देईल. सर्वांनी एकजुटीने काम करावे. नाशिक हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा एक पुरोगामी जिल्हा आहे. प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना संघर्षातूनच संधी मिळते तेव्हा संघर्ष करण्यास डगमगून जाऊ नये. जे पक्षाच्या पडत्या काळातही पक्षासाठी झटत राहिले त्यांना पक्षात प्रथम न्याय दिला जाईल.

यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष .पुरुषोत्तम कडलग यांनी प्रास्ताविक केले तर नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गायधनी यांनी बूथ कमिटी, गट आणि गण तसेच पदाधिकारी यांचा अहवाल सादर केला.
यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष पदी तुषार खांडबहाले तसेच विधानसभा कार्याध्यक्षपदी चेतन जाधव व युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी विशाल गायकर यांची तालुका संघटक पदी सुनील लहांगे व अतुल पवार यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रफुल्ल पवार, विनायक कांडेकर, विशाल गायकर, सचिन पवार, कुंदन ढिकले, अनिल पेखळे, ॲड नवनाथ कांडेकर,तेजश गायकवाड,संदेश टिळे, कुमार गायधनी, अतुल पवार,अक्षय अनवट,अभिषेक गायखे,शुभम जाधव, भास्कर मराडे, संदिप जाधव, महेश शेळके,शुभम थेटे, गोकुळ अनवट, अमित बोकड, धनाजी टोपले,पवण देशमुख, अविनाश फडोळ,आनंद ढेरींग,किरण वायकंडे, योगेश तिदमे, आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन तेजश देसले यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *