पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली जनतेच्या आरोग्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू- ना.भारती पवार


नाशिक: दक्ष पत्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सोपविलेल्या आरोग्याची जबाबदारी आपण प्रभावी पणे पार पाडू असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्य मंत्री ना. भारती पवार यांनी केले त्या जन आशीर्वाद यात्रेत ओझर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या.

या वेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ अशोक उईके ,आमदार राहुल हिरे,किशोर काळकर, माजी आमदार मंदाकिनी कदम, यतीन कदम, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी, नाशिक भाजप अध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस नाशिक ग्रामीण सुनील बच्छाव आदी उपस्थित होते.

रात्री नाशकात नाशिक शहर भाजप चे वतीने नाशिक शहरात फटाक्यांच्या आतिषबाजी व पुष्प वर्षाव करीत श्री राम चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले व त्या नंतर आज दिनांक १७ ऑगस्ट दुसऱ्या दिवसा ची जन आशीर्वाद यात्रा १० मैल नाशिक येथून सुरवात झाली त्या नंतर ओझर येथे भव्य स्वागत सभा झाली
त्या पुढे म्हणल्या मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आरोग्य खात्याचा कारभार देऊन जनतेची सेवा करण्याची खूप मोठी संधी दिली आहे व मी तुम्हाला वचन देते की मी जनतेची सेवा करण्यास कमी पडणार नाही तुमि फक्त कामे सांगा प्रश्न मांडा ते सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न शील राहील असे त्या म्हणाल्या चांदवड येथील स्वागत कार्यक्रमात बोलताना ना भारती पवार म्हणाल्या की आरोग्य खात्याबरोबरच शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न असो व द्राक्षांचा प्रश्न असो ते सोडविण्यासाठी ही प्रयत्न करू देशात ५५ कोटींपेक्षा अधिक कोरोना वरील लसीचे लसीकरण झाले असे त्या म्हणाल्या.

या वेळी राहुल आहेर यांनी भारती ताई पुढील २५ वर्षे तरी मंत्रीपदावर राहतील असे सत्कार च्या वेळी सांगितले चांदवड येथील स्वागत कार्यक्रमात आमदार राहूल आहेर,डॉ अशोक उईके, किशोरजी काळकर, केदा आहेर, सुनील बच्छाव,आत्माराम कुंभारडे, दादा जाधव भूषण कासलीवाल, सचिन दराडे, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

देवयानी फरांदे यांनी ओझर येथे बोलताना आपल्या भाषणातून तब्बल ६० वर्षानंतर नाशिक जिल्ह्याला भारती ताईंच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाले त्या बद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले, आमदार राहुल आहेर यांनी केंद्राच्या विविध योजनांचा माध्यमातून भारती ताई नाशिक जिल्ह्याचा कायापालट करतील असा आत्मविश्वास व्यक्त केलं , जन आशीर्वाद यात्रेचे सयोंजक यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले के भारती ताईंच्या जण आशिर्वाद यात्रेची मला सयोंजक म्हणून जबाबदारी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो या वेळी ओझरकर नागरिकांच्या वतीने अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी भारती ताईचा सत्कार केला व या सरकारने त्या भारावून गेल्या, यानंतर पिंपळगाव बसवंत येथेही त्यांचा जाहीर सत्कार झाला तसेच दरम्यान सकाळी यात्रा १० व मैल नाशिक, ओझर, पिंपळगाव, शिरवडे फाटा, वडाळी भोई, चांदवड येथून मालेगाव कडे रवाना झाली. यावेळी नाशिक ते चांदवड दरम्यानच्या काळात ना. भारती ताई पवारांवर पुष्प वर्षाव तसेच फटाके फोडून जोरदार स्वागत केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *