अभाविप नाशिक मार्फत 14620 घरातील 1 लाख नागरिकांनी घेतला भारत माता पूजनात सहभाग


नाशिक: करणसिंग बावरी

भारतीय स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपल्या देशाने या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात काल पदार्पण केले. यानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशातर्फे हर घर तिरंगा – घर घर तिरंगा अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आले. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सामूहिक ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारत माता प्रतिमा पूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले.

सदर अभियान अंतर्गत अभाविप नाशिक तर्फे ‘हर घर भारत माता! घर घर भारत माता: हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १४६२० घरात भारत माता प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या अभियानांतर्गत १४६२० घरातील एक लाख नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी भारत माता प्रतिमा पूजनात सहभाग घेतला.

या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रभक्ती ची ज्वाळा तेवत ठेवत अमृत महोत्सवी वर्षाची सुरवात अभाविप ने केलेली आहे असे प्रतिपादन अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे यांनी केले.

अभाविप च्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील १०० घरी संपर्क साधून भारत मातेची प्रतिमा व अभाविप चे माहिती पत्रक वाटप करून या अभियानाची माहिती सांगत त्यांना सामील करून घेतले. सोबतच अभाविप नाशिक चे कार्यकर्ते बस स्थानक, ट्रॅफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालये, बाजारपेठा इ. ठिकाणी वाटप करून देशभक्तीपर वातावरण संपूर्ण नाशिक मध्ये तयार झाले असे प्रतिपादन महानगर मंत्री सिद्धेश खैरनार यांनी दिली.

सदर अभियान 50 पेक्षा जास्त गावात जाऊन अभाविप ने राबवले. त्याचप्रमाणे या अभियानात ठिकठिकाणी तिरंगा फेरी, परिषद की पाठशाळा ठिकाणी ध्वजारोहण, 33 चौकात भारत माता पूजन करण्यात आले. यामुळे शालेय विद्यार्थी व नागतिकांचा आनंद द्विगुणित झाला. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी २०६ पेक्षा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले अशी माहिती अभियान प्रमुख श्रेयस पारनेरकर यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *