पंचवटीतील प्रसिद्ध जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 39 जणांना अटक


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

पेठ रोडवरील राहुलवाडी येथे एका इमारतीत बेकायदेशीररीत्या जुगाराच्या अड्डयावर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने छापा मारून १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत ३९ जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेची पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शंकर बाळू हिरे (रा. राहुलवाडी, पेठ रोड, पंचवटी), सचिन हंसराज कातारी ऊर्फ खिच्ची (रा. फुलेनगर, पंचवटी), मनोज बाळू हिरे (वय २९, रा. राहुलवाडी, पेठ रोड, पंचवटी) व त्यांचे ३६ साथीदार पंचवटीतील पेठ रोड येथील राहुलवाडीतील लक्ष्मीगंगा निवास या इमारतीलगत जुगार खेळत असल्याची कुणकुण मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना लागताच मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सदर अड्डयावर छापा मारून संशयितांसह १ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, तसेच नोटपॅडच्या बुकमधील चिक्या जप्त केल्या.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार अधिनियम १८६७ चे कलम ४/५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

पण प्रत्येक्षात जेव्हा बातमी मागची बातमी घेतली तर समजलं की कारवाई फक्त दाखविण्यात आली आहे. अटक फक्त एकाला करण्यात आली व त्यानंतर त्या एकास ही सोडून देण्यात आलं- स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *