माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना पोलीस कोठडी


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

लाच खोर वीर चौकशीनंतर फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर ( वीर ) लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत. अटकपूर्व जामिनावर सुनावणी होण्यापूर्वी त्यांनी एसीबी कार्यालय गाठले. यामुळे त्यांना आता कोर्टात हजर करण्यात आले. वीर यांना अटकपूर्व जमीन फेटाळला जाण्याची शक्यता असल्यानं त्या हजर झाल्याची चर्चा शहर भर सुरू होती. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केल्या नंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. तसेच त्यांचे साथीदार प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते व शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आठ लाख रुपयांच्या लाचप्रकरणी ‘एसीबी’ नं ताब्यात घेतलेल्या व चौकशीनंतर सकाळी हजर रहाण्याच्या हमीवर घरी परतलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी हातावर तुरी दिली आहे. दरम्यान अन्य दोन संशयित म्हणजेच प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते व शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना बुधवारी न्यायालयाने १३ अॉगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-विर (वय ४४) यांना लाचप्रकरणात चालक व प्राथमिक शिक्षकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ‘एसीबी’ ने तब्बल आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे. या अगोदरही माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी होत्या.

श्रीमती वैशाली पंकज विर, (वय ४४ वर्षे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक), शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले तसेच पंकज रमेश दशपुते (प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी ता. नाशिक) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत.

ठाणे येथून शहरात दाखल झालेल्या ‘एसीबी’ च्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आठ लाख रुपये स्वीकारताना त्यांच्या चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याला लाचेसंदर्भात विचारणा केली असता त्याने थेट झनकर यांचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन पथक झनकर यांच्या कार्यालयात धडकले. कार्यालयाचे दार बंद करून श्रीमती झनकर यांची चौकशी सुरु होती. या चौकशी नंतर सर्व प्रकार समोर आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *