राजीवनगर येथून बससेवा सुरू करण्याची हिंदू जनसंपर्क कार्यालयाची मागणी

नाशिक: दक्ष प्रतिनिधी

राजीवनगर, इंदिरानगर परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची मागणी आज हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.

राजीवनगर, इंदिरानगर, शालिमार, सिबीएस मार्गे पंचवटी अशी चक्री बससेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन आज (NMPM) नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक माननीय श्री. मिलिंदजी बंड यांना देण्यात आले.

विशेष म्हणजे यावेळी मिलिंदजींनी ह्या बस वाहतूक सेवेचे फायदे, नागरिकांची सुरक्षा या बद्दल आम्हाला योग्य माहिती दिली. आणि आश्वासन दिले की येत्या दिवाळी पर्यंत आपली ही मागणी मान्य करून आम्ही आपल्या परिसरातील नागरिकांना बससेवा उपलब्ध करून देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *