के के वाघ विद्याभवनाच्या रस्सीखेच संघाची गरुड झेप
दक्ष न्यूज :योगेश कर्डीले
नाशिक : नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत के के वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगरच्या १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी विजेतेपद तर १९ वर्ष वयोगटातील खेळाडूंनी उपविजेते पद पटकावले.यातील विजेत्या १७ वर्ष वयोगटातील संघाची शालेय विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली.

त्याबद्दल के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरदादा वाघ,विश्वस्त शकुंतलाताई वाघ, जनसंपर्कप्रमुख अजिंक्यदादा वाघ,विद्याभवनाचे प्राचार्य अशोक बस्ते, समन्वयक यशवंत ढगे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी नाठे यांनी संघातील खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर ,क्रीडाशिक्षक धनंजय मोरे यांचे अभिनंदन करून शालेय विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.