मराठी रंगभूमी तर्फे रंगकर्मीचें सरकार विरोधात दादर येथे आंदोलन


मुंबई: दक्ष प्रतिनिधी

दादर येथील दादासाहेब फाळके पुतळ्याजवळ, हिंदमाता मार्केट च्या समोर मराठी रंगभूमीतर्फे रंगकर्मी, कलाकार चें आगळेवेगळे आंदोलन शांततेत करण्यात आले. कोरोना महामारी ची झळ मोठया व सर्वसामान्य लोकांसहित बसली आहे.मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष कोरोना महामारीने लढत आता कलाकारांचा संयम सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व कलाकार, रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. आपल्या या अस्वस्थेला वाट मोकळी करून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगभूमी कलाकारांनी घेतला असून शासनादरबारीं आपल्या मागण्या सादर करणार आहेत. नेमक्या कोणत्या मागण्या काय आहेत यासाठी पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली.

आंदोलनात हजारो कलाकार, रंगभूमी रंगकर्मी, पोवाडा, तमाशा फड, और्केष्ट्रा, भारूड, अशा विविध स्तरातील कलाकार नीं आपली उपस्थिती दाखवली. प्रत्येक कलाकारांना समवून 5000 हजार देण्यात यावे, आणि प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंट मध्ये 5000 जमा करावेत. कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याने हे आंदोलन शांततेने करण्यात आले. भोईवाडा पोलीस ठाण्यात सर्व रंगाकर्मी कलाकारांना अटक करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहित केंद्र सरकार व राज्य सरकार ला प्रस्ताव पाठवून तातडीची बैठक घेऊन कलाकारांना आंदोलनमागे घेण्याचे आश्वासन भोईवाडा पोलिसांनी केले. कलाकारांना धीर देण्यात आला. हे रंगकर्मी चें आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येत आहे.

रंगकर्मी आंदोलनात सहभागी, भांडुप कलाकार कट्टा ग्रुप चें संचालक निखिल चव्हाण,अभिनेते विजय पाटकर, अभिनेते विजय गोखले,दिग्दर्शक संचित यादव,विजय राणे,मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे,प्रमोद मोहिते, सुभाष जाधव,हरी पाटणकर, सहित संघटक, उपसंघटक, मराठी चित्रपट सृष्टितील सर्व कलाकार उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *