टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास; नीरज चोपडा ने जिंकलं गोल्ड मेडल

  • ऑलिम्पिक इतिहासात ट्रॅक अँड फिल्ड ॲथलिटमध्ये मेडल जिंकणारा पहिला भारतीय ठरला नीरज चोपडा

टोकियो: दक्ष प्रतिनिधी

आत्मविश्वास म्हणजे नीरज चोपडा आज नीरजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन हिंदुस्थान दाखवून दिला. व गोल्ड मेडल मिळविले. सुरुवाती पासून भाला फेक स्पर्धेत एक नंबर मिळविणाऱ्या नीरजने अंतिम सामन्यात इतिहास घडवत भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये सोनं मिळवून दिलं.

टोकियो ऑलम्पिकमध्ये आज भारताने इतिहास घडविला आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोडाने भालाफेक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. नीरजने पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली होती. भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे.

दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं ८७.५८ मीटर एवढ्या अंतरावर थ्रो फेकला आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. नीराजच्या विजया नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *