पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण
नाशिक: दक्ष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2012 नुसार युवा हा घटक महत्वाचा मानला आहे. त्यानुषंगाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या युवक,युवतींच्या कामगिरीचा गौरव व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे , जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक व पुरस्कार प्राप्त युवक व युवती उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते सन 2018-19 साठी हेमंत काळे, अश्विनी जगदाळे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. तसेच उधाण युवा बहुउद्देशीय मंडळ या संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले.सन 2019-20 साठी चिन्मय देशपांडे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. शिव युवा प्रतिष्ठाण देवळाली कॅम्प संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले
सन 2020-2021 साठी मोनाली सुनिक चव्हाण यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. जय योगेश्वर बहुउद्दशीय संस्था कळवण यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले.