दक्ष न्यूज – भव्य गणेशोत्सव सजावट व आरास स्पर्धा 2024: आकर्षक बक्षिसांसह घरगुती गणेशोत्सव साजरा करा
- ‘दक्ष न्यूज’ आणि कर्तव्यदक्ष फाऊंडेशन पोलीस मित्र, शिवश्रध्दा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजन
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक: यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘दक्ष न्यूज’ आणि कर्तव्यदक्ष फाऊंडेशन पोलीस मित्र, शिवश्रध्दा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे भव्य गणेशोत्सव सजावट व आरास स्पर्धा 2024 चे आयोजन केले आहे. गणपती बाप्पांचे आगमन ७ सप्टेंबर रोजी उत्साहात झाले असून, यानिमित्ताने घराघरांत विविध प्रकारच्या आकर्षक सजावटीच्या आराशांचे आयोजन होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सहा विभागांमध्ये घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा राबवण्यात येणार आहे, ज्यात सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे वैशिष्ट्य:
स्पर्धेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, समाजप्रबोधनपर देखावे आणि पर्यावरणपूरक सजावट यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये शाडू, लालमाती, शेणमाती, कागदाचा लगदा तसेच धातूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सजावटीसाठी विभागवार तीन प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकांसह एकूण १८ विजेते निवडले जाणार आहेत. विभागांमध्ये पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको, आणि नाशिकरोड यांचा समावेश आहे. तसेच, घरगुती गौरी-गणपती सजावटसाठी शहरातून एकूण तीन प्रमुख पारितोषिके दिली जातील.
स्पर्धेचे नियम व सहभाग प्रक्रिया:
- स्पर्धेत सहभाग मोफत आहे.
- सहभागासाठी प्रत्येक कुटुंबाला प्रमाणपत्र दिले जाईल.
- विजेते ठरवण्यासाठी परीक्षक घरगुती गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी कधीही भेट देतील किंवा स्पर्धकांनी व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोटो आणि व्हिडिओ पाठवावेत.
- सहभागासाठी दिलेल्या क्रमांकावर ४ फोटो व ३ मिनिटांचा एचडी व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे.
- गणेश स्थापना ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान अर्ज स्वीकृत केले जातील.
संपर्क व नोंदणी:
सहभागासाठी व अधिक माहितीसाठी, स्पर्धकांनी खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या देखाव्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवावेत:
- 9511944111
- 9325433331
- 9561895786
- 09164147089
बक्षीस समारंभ:
बक्षीस समारंभाची तारीख ‘दक्ष न्यूज’ वर जाहीर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
‘दक्ष न्यूज’चे संचालक करणसिंग बावरी, संपादक अमित कबाडे, तसेच कर्तव्यदक्ष फाऊंडेशनचे श्री. सुनिल परदेशी, विरेंद्रसिंग टिळे, सौ. श्रध्दाताई दुसाने आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गणेश भक्तांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.