महाराष्ट्र

दक्ष न्यूज – नाशिक जिल्ह्यातील २१७२ उमेदवारांना मिळणार ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमांतर्गत रोजगार


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

नाशिक : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जवळपास २१७२ उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम योजनादूतांकडून केले जाणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त होणाऱ्या योजनादूतांना दरमहा 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी 13 सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या निवडीचे निकष:

  • वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
  • उमेदवार पदवीधर असावा आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • संगणकाचे ज्ञान असावे.
  • उमेदवारांकडे अद्ययावत स्मार्टफोन आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यातील योजनादूतांची संधी:
नाशिक जिल्ह्यात एकूण १३८३ ग्रामपंचायती, तसेच नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका, मनमाड, येवला, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यांसारख्या नगरपरिषदांमध्ये योजनादूतांची नियुक्ती होणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील २१७२ उमेदवारांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आहे.

राज्यभरातील या उपक्रमात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड होणार आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *