काझीगडी संरक्षण भिंत बांधा व जुने गावठाण क्लस्टर डेव्हलोपमेंट स्कीम राबवा; नगरसेवक व रहिवाश्यांची आयुक्तांकडे मागणी


नाशिक: करणसिंग बावरी

काझीगडी संरक्षण भिंत व जुन्या गावठाणात क्लस्टर डेव्हलोपमेंट बाबत स्थानिक नागरिक व नगरसेवक गजानन (नाना) शेलार, वत्सलालाई खैरे, वैशालीलाई भोसले यांच्या समवेत मनपा आयुक्तांकडे गेले व आयुक्तांकडे काझीगडी संरक्षण भिंत बांधण्याकरिता आयुक्तांनी जातीने लक्ष्य द्यावे अशी मागणी करीत नेहमी होणारा पाऊस व दिवसेंदिवस ढासळनारी काझीगडी हे बघता भविष्य काळामध्ये मागील प्रमाणेच काझीगडी ढासळून २ कुटुंब गाडले गेल्याचा अपघात झाला होता सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र त्यानंतर काझीगडीकडे झालेले दुर्लक्ष्य भविष्यकाळामध्ये स्थानिक रहिवाश्यांचे बळी घेतल्या शिवाय राहणार नाही यासाठी म्हणून प्र.क्र.१३ मध्ये असलेल्या सर्व कामांचा निधी वापरून किंवा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काझीगडी संरक्षण भिंत बांधली गेली पाहिजे यासाठी म्हणून आग्रही मागणी नगरसेवक गजानन (नाना) शेलार, वत्सलाताई खैरे, वैशालीलाई खैरे व स्थानिक रहिवाश्यांनी केली त्याचप्रमाण देवरील असलेली १५ ते १६ घरे हे त्वरित स्थलांतरीत करावे अशी विनंती देखील केली.

तसेच जुन्या गावठाणातील घरे हे अतिशय जुने असल्यामुळे तसेच येथील वाडे संस्कृती असल्यामुळे तसेच घरमालक व भाडेकरी यांचे असलेले चिखला-मातीचे वैर लक्षात घेता तसेच एकदुसर्यावर रेकून असलेले घरे शेजारांच्या आधारावर उभे असलेले वाडे कधी व केव्हा कोसळतील हे हि सांगता येणार नाही यासाठी म्हणून क्लस्टर डेव्हलोपमेंट स्कीम हीच जुन्या गावठाणाचा विकास करू शकेल त्याकरिता म्हणून सदर विषय महासभेवर प्रशासनाच्या माध्यमातून पाठविण्यात यावा व जुन्या गावठाणाच्या व जुने नाशिक यांच्या विकासाला चालना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली यावर सकारात्मक चर्चा झाली असे नगरसेवक गजानन शेलार यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *