दक्ष ब्रेकिंग – नाशिकमधील खाजगी शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिडकोवासीयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
उपेन्द्र नगर येथील खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने, पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. शिक्षकाने मुलीला कविता लिहिण्यास सांगत तिच्या अंगावर अंगलट करून स्त्री मानसिक लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पालकांनी सांगितल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपेन्द्र नगर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाचे वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे प्रकरणाचा तपास करत आहेत.