सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंगार व्यवसायिकाकडून लाच मागणाऱ्या पोलिसावर कारवाई
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : सातपूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई अनंता महाले (वय 38) याने तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.
तक्रारदाराचा भंगार व्यवसाय आहे, आणि त्याच्या भावाला अटक करण्याच्या धमकीवरून लाच मागण्यात आली होती. तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महाले याला रंगेहाथ पकडले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.