देशनाशिकमहाराष्ट्र

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिक येथे संपन्न


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

नाशिक : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तसेच दीप प्रज्वलन करुन अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.

त्या नंतर पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया, कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालविणारे संजय यादवराव, शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतिशील शेतकरी द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते. त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली.

याप्रसंगी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळात 300 उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अगदी छोट्या छोट्या स्किल पासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचे सांगितले. राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटीया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतीसंबंधीच्या अडचणी आणि शेती ही एक इंडस्ट्री असून त्याची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा सांगितले. शेतीमधील रोजगार आणि रोजगाराभिमुख संधी एक द्राक्ष पीक व वर्षभर देते. सरकारने योग्य त्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असल्याचे दाखवून दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

जगभरात प्रसिध्द असलेल्या सह्याद्री फ्रार्म्सचे संस्थापक विलासजी शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतिशील शेतकरी निर्माण केल्याचे सांगून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याचे सांगितले. सह्याद्री फार्म्सचा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन, आर्थिक नियोजन, सामूहिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे सांगितले. संजयजी यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगतांना कोकणातील परिस्थिती वर्णन केली. कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा ना की विकावी असे आवाहन त्यांनी केले.

या अधिवेशनात छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली. नाना बच्छाव, योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके, अशोक दुधारे सर, अशोक कदम, संजय फडोळ, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल आहेर, सागर बागुल, सागर कातड, आण्णा पिंपळे, विलास गडाख, गौरव गाजरे, वैभव वडजे, स्वातीताई जाधव, शोभाताई सोनवणे, ऍड. स्वप्नाताई राऊत, ओमकार दुगजे, विश्वास वाघ, राम निकम, मंगेश पाटील, प्रल्हाद जाधव, नितीन काळे, सुवर्णाताई पाटील, रोहिणीताई उखाडे, सचिन पवार, संदीप बर्हे, राज पाटील, अनिताताई ढेमसे, प्रमिलाताई पाटील, हेमंत देशमुख, विष्णू अहिरे, गणेश पाटील, महेंद्र बेहरे, प्प्रितेश रायते, राजेंद्र देवकर आदींनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर, त्रिलोक भामरे, समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *