नाशिक

कादवा नदीकाठ लगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा..


दक्ष न्यूज प्रतिनिधी

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार चालू झाली आहे तसेच धरण क्षेत्रात देखील पावसाने तुफान बॅटिंग केली आहे त्यातच पालखेड धरण साठा दु.1.00 वाजता 467 दलघफु ( 71%) इतका झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील धामण व कोलवण नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. पालखेड धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील झपाट्याने होणारी वाढ बघता आज दि.3 ऑगस्ट 2024 रोजी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये 900 दलघफू पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात येणार आहे.

तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कादवा नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठ लगतच्या नागरिकांनी नदीच्या प्रवाहात जाऊ नये व येथील नागरिक तसेच पशु धन चीज वस्तू याना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *