नाशिक

किकवी धरणाचा प्रश्न कॅबिनेट बैठकीत मार्गी लावणार ; पालकमंत्री भुसेंची बैठकीत माहिती..


दक्ष न्यूज प्रतिनिधी

नाशिक : नाशिक शहराची २०४१ मधील लोकसंख्या गृहित धरून जलसंपदा विभागाने २००९ मध्ये किकवी पेयजल प्रकल्पाला गंगापुर धरणातील साठलेले गाळ ला पुर्णस्थापित करणेसाठी मंजुरी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरातील या धरणाची सुरवातीला २८३ (दरसूची 2008-09)कोटी रुपये असलेली किंमत आता १४०० (दरसूची 2021-22)कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या धरणाची गरज लक्षात घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत कामाचा आढावा घेतला असून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय प्राधान्याने घेणार असल्याचे मंत्री भुसे यांनी बैठकीत सांगितले.या बैठकीस महसूल विभागाचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,उपवनसंरक्षक पंकज गर्ग,कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभाग मनोज ढोकचोळे ,उपजिल्हाधिकारी, लघु पाटबंधारे भूसंपादन, नाशिक अनुपसिंह यादव,उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग मनोजकुमार पाण्डेय, , तहसिलदार, त्र्यंबकेश्वर श्वेता संचेती, अभियंता श्रे-2. लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग.सुजय दुबे आदी उपस्थित होते.

नाशिक शहरास प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असून उर्वरित मुकणे व दारणामधून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणावर शेतीसाठी आरक्षण असल्यामुळे भविष्यातील वाढीव लोकसंख्येला गंगापूर धरण अपुरे पडणार आहे. दारणा धरणातून भविष्यातील वाढीव नाशिकला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा असून मुकणे धरणातून केवळ १.५ टीएमसी पाणी आरक्षित आहे. यामुळे २०४१ पर्यंतच्या नाशिक शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी त्र्यंबकेश्व र तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या धरणाची 2485 दलघफू साठवण क्षमता असून ते सर्व पाणी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. या प्रकल्पास राज्य सरकारने २६ ऑगस्ट २००९ रोजी २८३ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर ४ डिसेंबर २०१२ ला पाटबंधारे विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक कार्यालयाकडून धरणाच्या आराखड्यास मंजुरीही दिली.

नाशिक महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यात पाणी उपलब्धतेबाबत झालेल्या करारानुसार २०२१ पर्यंत किकवी धरणातून 2120 दलघफू पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, या धरणाबाबत मधल्या काळात काहीही प्रगती न झाल्यामुळे इतर धरणांमधील सिंचनाच्या पाण्यावर त्याचा बोजा पडत असून नाशिककरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वनविभागाला १७२ हेक्टर जागेपोटी ३६ कोटी रुपये वर्ग करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. किकवी नदीवर 2.50 टीएमसी क्षमतेच्या धरणासाठी १४०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. भूसंपादनासाठी 662कोटी, तर बांधकाम व इतर कामांसाठी 738 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

असा आहे किकवी प्रकल्प
ठिकाण : ब्राम्हणवाडे, ता. त्र्यंबक
उपलब्ध पाणी : 2485 दलघफू (पेयजल साठी)
खोरे : गोदावरी
पाणलोट क्षेत्र : ७० चौ.कमी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *