क्राईमनाशिक

मोटार सायकल चोरी करणारा आरोपी गजाआड, विशेष पथकाची कामगिरी..


दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक : विधी संघर्षित बालकांच्या मदतीने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. विशेष पथकातील पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना संशयित आरोपी हा रविवार कारंजा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दिनांक 31 जुलै रोजी या ठिकाणी सापळा रचत आरोपी यश सुनील अहिरे यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची कसून चौकशी केली असता तीन साथीदारांनी मिळून मॉडर्न चौक कॉलेज रोड नाशिक येथून एक्टिवा मोपेड गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. .
सदर गाडी ही गंगापूर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.. याबाबत पंचनामा करण्यात आला असून संशयित इसमास पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. .

सदरची कामगीरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त साो. गुन्हे, मा.श्री. संदिप मिटके, सपोआ गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वपोनि. जयराम पायगुडे, सपोनि. हेमंत नागरे, पोउनि. मुक्तेश्वर लाड, श्रेपोउनि. दिलीप सगळे, दिलीप भोई, पो. हवा. किशोर रोकडे, भरत डंबाळे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव, गणेश वडजे, चारूदत्त निकम व मपोहवा, मंगला जगताप, सविता कदम यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *