नाशिक मनपाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..
दक्ष न्यूज प्रतिनिधी
नाशिक : समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली. त्याच पार्शवभूमीवर
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने देखील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी
महानगरपालिकेच्या वतीने बिडी भालेकर हायस्कूल शेजारील त्रंबक रोड नाशिक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त श्रीकांत पवार, अजित निकत,मयुर पाटील शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,कार्यकारी अभियंता सचिन जाधव,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड,डॉ नितीन रावते, सह आयुक्त जवाहरलाल टिळे,उपअभियंता नितीन राजपूत,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,विभागीय अधिकारी तुषार आहेर, अधिक्षक रमेश बहिरम,आयुक्त यांचे स्वीय सचिव दिलीप काठे,कैलास दराडे,संतोष चंद्रात्रे, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, नितीन गंभीरे,विश्वास कांबळे,दीपक बंदरे,सगर पीठे,रमेश पागे आदींसह अधिकारी कर्मचारी नागरीक उपस्थित होते.