उरण मधील यशश्री शिंदेच्या हत्ये प्रकरणी दिंडोरी येथे जाहीर निषेध..
दक्ष न्यूज प्रतिनिधी संतोष विधाते
मुंबई : उरण मधील युवती यशश्री शिंदेची दाऊद शेख नामक युवकाने हत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.देशातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी येथे देखील भाजपा महिला आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला तसेच सदर आरोपीवर कडक कारवाई करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून भाजपा महिला आघाडीच्या दिंडोरी तालुका अध्यक्ष उज्वला उगले यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना याबाबत निवेदन देण्यात आले..

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, भाजपा संयोजक रणजित देशमुख, माजी नगरसेवक निलेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौशिफ मनियार, मंदा गायकवाड, श्रीमती संध्या निरगुडे, सविता महाले,संगीता घिवंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.