देशनाशिक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकले दुसरे पदक, ‘या’ जोडीने केली कमाल


दक्ष न्युज प्रतिनिधी

पॅरिस ऑलिंम्पिक मध्ये भारताने जिंकले दुसरे पदक, ‘या’ जोडीने केली कमाल

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पॅरिस ऑलिंम्पिक मध्ये भारताने दुसर पदक जिंकल असून भारताच्या मनू भाकर हिने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल मध्ये कांस्यपदक पटकावले होते तर पॅरिस ऑलिंम्पिक 2024 मध्ये भारताच हे पहिलं कांस्यपदक ठरलं होतं..

त्यानंतर ऑलिंम्पिक मध्ये मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्या जोडीने इतिहास रचत दहा मिनिटे एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकल आहे. . तसेच एकाच ऑलिंम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. .

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून हे कांस्यपदक जिंकल आहे. . दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे कांस्यपदक मिळाल आहे. .
यामुळे या दोघांचं पूर्ण भारतभर कौतुक केले जात आहे. .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *