नाशिक

नाशिक सिटीलिंक बस चालकांचा संप अखेर मागे…


दक्ष न्यूज प्रतिनिधी : दिनेश पगारे

नाशिक : सिटींलिंक बस चालकांचा मागील तीन दिवसांपासून संप सुरू होता बस चालक हे आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून सिटी लाईफ लाईन या कंपनीकडे पगार वाढीसाठी, प्रस्थान भत्त्यासाठी मागण्या करत होते मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याने शनिवारी दिनांक 27 जुलै सकाळी 5 वाजेपासून सोमवार दिनांक 29 जुलै सायंकाळी 4 वाजे पर्यंत हा संप सुरू होता सायंकाळी 4 वाजता मागण्या पूर्ण झाल्यानंतर नाशिक रोडच्या अर्जुन मळा बस डेपो येथे बस चालकांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस अंकुश पवार यांच्या मध्यस्थीने सिटीलींक बस चालकांचा प्रश्न मार्गी लागल्याने मोठा जल्लोष करण्यात आला.


यामध्ये 5 हजार रुपये पगार वाढ झालेली आहे तर एक रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढला आहे, डबल ड्युटीला तीन ड्युटीचा पगार देण्यात येणार आहे ,सी एल पी एल नुसार वार्षिक सुट्ट्या 15 ते 20 देण्यात आलेले आहेत.त्यामुळे सिटी लिंक चे अधिकारी व कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांचे आभार व्यक्त केले..

यावेळी नाशिक रोड बस डेपो चे युनियन अध्यक्ष किरण सांगळे, उपाध्यक्ष समाधान घोटेकर ,कार्याध्यक्ष प्रकाश खरे, खजिनदार गणेश शेरेकर, मुजाहिद खान, नाना आहेर ,सचिन काळे आदींसह चालक उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *