एका अनोळखी व्हायरसने घेतला लहान मुलाचा बळी..
दक्ष न्युज : प्रतिनिधी योगेश कार्डिले
निफाड : तालुक्यातील लासलगाव येथील चि.रिम रोशन जैन नामे लहान मुलगा वय (8) याचा एका व्हायरसने बळी घेतलाय.
शनिवार दिनांक 27 जुलै रोजी लासलगाव येथे त्याची त्यबेत खराब झाल्यानंतर नाशिक येथील सुयोग रूग्णालय येथे त्यास आणण्यात आले.
तेथील रुग्णालयातील डॉक्टरांंना देखील या उपचारादरम्यान हा आजार लक्षात आला नाही, त्यामुळे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला .
डॉक्टरांच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील हे 8 वे रूग्ण आहे असे सांगण्यात आल आहे.. तर अश्या प्रकारच्या व्हायरस चा सामना करण्यासाठी आपल्या मुलाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याची काळजी घ्यावी असे आव्हान डॉक्टरांनी केले.